भाग्यनगर येथे ‘सनातन हिंदु संघ संस्थे’च्या ‘दिवाली मिलान’ कार्यक्रमात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘हलाल प्रमाणपत्र’ विषय सादर !

प्रेक्षकांसमोर विषय मांडतांना श्री. चेतन गाडी
श्री. चेतन गाडी

भाग्यनगर (हैद्राबाद) – येथे ‘सनातन हिंदु संघ संस्थे’च्या वतीने ‘दिवाली मिलान’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘हलाल प्रमाणपत्र : भारताला इस्लामीकरणाकडे घेऊन जाणारा आर्थिक जिहाद’ हा विषय सादर करण्यात आला. समितीचे आंध्रप्रदेश समन्वयक श्री. चेतन गाडी यांनी हा विषय सादर केला. या कार्यक्रमामध्ये १२५ हून अधिक व्यावसायिक आणि हिंदुत्वनिष्ठ सहभागी झाले होते.

क्षणचित्रे

१. या कार्यक्रमानंतर एका व्यक्तीने येऊन समितीच्या कार्यकर्त्यांना सांगितले की, भाग्यनगरमधील एका सुपर मार्केटमध्ये तूरडाळीच्या पाकिटावर त्याने ‘हलाल’चे चिन्ह पाहिले. या कार्यक्रमामुळे मला ‘हलाल’विषयी प्रथमच माहिती समजली. त्यावर उपस्थित असलेल्या अन्य एका हिंदुत्वनिष्ठांनी ‘मी त्या सुपर मार्केटच्या मालकांना ओळखत असून त्यांना भेटून हलालविषयी माहिती सांगतो’, अशी सिद्धता दर्शवली.

२. या कार्यक्रमामध्ये उपस्थित असलेल्या एका हिंदुत्वनिष्ठांनी दुसर्‍या दिवशी ‘स्वदेशीदिन’ या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमामध्ये त्यांनी हिंदु जनजागृती समितीला ‘हलाल अर्थव्यवस्था’ या विषयावर मार्गदर्शन करण्याची संधी दिली.

‘दिवाली मिलान’ कार्यक्रमामध्ये मांडण्यात आली ‘हिंदु टू हिंदु’ संकल्पना !

‘दिवाली मिलान’ कार्यक्रमामध्ये ‘हिंदु टू हिंदु’ (एच्. टू एच्.) ही संकल्पना उपस्थितांच्या समोर मांडण्यात आली. ‘हिंदूंनी केवळ हिंदूंशीच व्यापार करावा’, या उद्देशाने ‘सनातन किराणा स्टोअर्स’चा प्रारंभ करण्यात आला. या संकल्पनेप्रमाणे वितरकांची एक साखळी पद्धत (चेन सिस्टिम) बनवण्यात आली आहे. त्याप्रमाणे प्रत्येक भागात एक वितरक असणार आहे. या वितरकाकडे ‘व्हॉट्सॲप’च्या माध्यमातून साहित्याची मागणी दिल्यावर ते २४ घंट्यांत घरपोच देण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. हे सर्व साहित्य ‘हलालविरहित’ असणार आहे. यामध्ये ‘जलद कृती दला’चेही गठन करण्याची योजना आहे. या अंतर्गत कोणताही हिंदू संकटात असल्यास त्या ठिकाणी १ घंट्याच्या आत २५ ते ३० हिंदू उपस्थित होतील आणि पीडित हिंदूंना आधार देतील, अशी व्यवस्था करण्यात येणार आहे.