१. वेळेचे पालन करणे : ‘मी सौ. अंजली बंडेवारकाकूंच्या समवेत जिज्ञासूंना संपर्क करण्याच्या सेवेसाठी जाते. त्या सेवेच्या वेळेचे नेहमी पालन करतात.
२. त्यांची स्मरणशक्ती उत्तम असून त्यांच्यात सभाधीटपणा आहे.
३. उत्तम वक्तृत्व : प्रसारातील विशेष उपक्रमांच्या वेळी उपलब्ध वेळेप्रमाणे त्या सूत्रबद्ध विषय मांडून जिज्ञासूंना मार्गदर्शन करतात, तसेच त्या वेगवेगळ्या विषयांवर लेखही सिद्ध करतात.
४. सेवेची तळमळ : काकूंचे वय ७३ वर्षे आहे, तरीही त्या घरातील सर्व कामे करून सेवा करतात.
५. प्रेमभाव : काकूंमध्ये प्रेमभाव आहे. त्यामुळे त्या रहात असलेल्या जगदंबा चौकातील सर्व लोक त्यांना ओळखतात.
६. भाव : ‘गुरुपौर्णिमेच्या प्रसारादरम्यान आम्ही साधक दुपारी डबा खाण्यासाठी त्यांच्या घरी एकत्रित येणार आहोत’, हे काकूंना कळल्यावर त्यांनी ‘माझ्या घरी माझे गुरुदेव आले आहेत’, या भावाने आमच्यासाठी साजूक तुपातील गोड खाऊ बनवला. त्या वेळी काकूंना पुष्कळ आनंद झाला होता.
७. सौ. काकूंनी त्यांच्या नातीवर चांगले संस्कार केले आहेत.
८. ‘अंजली’ या शब्दाचा जाणवलेला अर्थ
अं – अंतर्मुख होऊन
ज – जपसाधनेत
ली – लीन असणार्या सौ. अंजली बंडेवार !’
– सौ. वर्षा वैद्य, सोलापूर (३.१.२०१९)