१. रामनाथी आश्रमात आल्यावर ‘संतांच्या माध्यमातून परात्पर गुरुदेवांचे कृपाछत्र अनुभवायला मिळत आहे’, याबद्दल सतत कृतज्ञता व्यक्त करणे
‘कु. सायलीच्या वडिलांच्या (रवींद्र देशपांडे यांच्या) निधनानंतर २ मासांनी ती तिची आई (श्रीमती धनश्री देशपांडे) आणि लहान भाऊ (कु. श्रीनिवास देशपांडे, वय १० वर्षे, आध्यात्मिक पातळी ६२ टक्के) यांच्या समवेत काही दिवसांसाठी रामनाथी आश्रमात रहायला आली. तेव्हापासून ‘रामनाथी आश्रमात रहायला मिळत आहे आणि आश्रमातील संत अन् सद्गुरु यांची भेट होऊन त्यांच्या माध्यमातून परात्पर गुरुदेवांचे कृपाछत्र अनुभवायला मिळत आहे’, याबद्दल कु. सायलीला पुष्कळ कृतज्ञता वाटते. ती सतत कृतज्ञता व्यक्त करत असते.
२. स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया गांभीर्याने राबवणे
सायली रामनाथी आश्रमात रहायला आल्यावर तिला स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया शिकण्यास सांगण्यात आले. त्यासाठी तिला दिवसभराचे नियोजन करून देण्यात आले. तिने स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवायला चालू केल्यापासून एकही दिवस सेवा, व्यष्टी साधनेचा आढावा किंवा भाववृद्धी सत्संग यांना जाण्याचा कंटाळा केला नाही. ती प्रतिदिन उत्साहाने नियोजनानुसार कृती करते.’
– श्री. धैवत वाघमारे (मामा), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२६.१०.२०२१)