सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवावर निर्बंधांचे सावट !

पुणे – भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांचे हे जन्मशताब्दी वर्ष असल्याने सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव व्हावा, अशी सर्व शास्त्रीय संगीतप्रेमींची इच्छा आहे; मात्र राज्य सरकारने घालून दिलेल्या नियमांनुसार मोकळ्या मैदानात होणार्‍या कार्यक्रमांना २५ टक्के प्रेक्षक मर्यादेचे बंधन आहे; पण या महोत्सवासाठी किमान ५० टक्के प्रेक्षकांना उपस्थित रहाण्याची अनुमती मिळावी, यासाठी प्रयत्न केला जात आहे. ही अनुमती मिळाली तर महोत्सवाचे स्वरूप, पायाभूत सोयी-सुविधांची उभारणी, कलाकारांची उपलब्धता आणि त्यांची निवासव्यवस्था याचाही विचार करणे आवश्यक आहे, असे आर्य संगीत प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी सांगितले.