बंगाली हिंदूंवरील अत्याचारांच्या विरोधात आवाज उठवणारे ट्विटर खाते तात्पुरते बंद !

नवीन आणि तेही हिंदु धर्मीय मुख्य कार्यकारी अधिकारी नियुक्त झाले तरी ‘ट्विटर’चा हिंदुद्वेष चालूच !

हिंदूंनी आणि त्यांच्या संघटनांनी ट्विटरचा हिंदुद्वेष मोडून काढण्यासाठी संघटित होऊन प्रयत्न केला पाहिजे ! तसेच केंद्र सरकारनेही यात हस्तक्षेप करून ट्विटरची मनमानी रोखण्यासाठी पाऊल उचलले पाहिजे ! – संपादक

नवी देहली – बंगालमधील हिंदूंवरील अत्याचारांविषयी ट्विटर या सामाजिक माध्यमांतून आवाज उठवणार्‍या ‘स्टोरीज ऑफ बंगाली हिंदूज’ नावाच्या वापरकर्त्याचे खाते तात्पुरते बंद करण्यात आले आहे. हे खाते डॉ. संदीप दास चालवत होते. त्यांनी या कारवाईची माहिती दिली. नियमांचे उल्लंघन केल्यावरून ही कारवाई करण्यात आल्याचे ट्विटरकडून सांगण्यात आले आहे. यापूर्वी नवरात्रोत्सवामध्ये बांगलादेशात धर्मांधांनी हिंदूंवर केलेल्या अत्याचारांची माहिती देणारी ‘इस्कॉन बांग्लादेश’ आणि ‘बांगलादेश हिंदू यूनिटी काऊंसिल’ ही ट्विटर खाती बंद करण्यात आली होती.

१. याविषयी सामाजिक माध्यमांतून ट्विटरवर टीका होत आहे. शिक्षिका डॉ. इंदु विश्‍वनाथन् यांनी ट्विटरचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी पराग अग्रवाल यांना उद्देशून, ‘हिंदूंनी त्यांचे अनुभव सांगणे म्हणजे हिंसा आहे का ? हिंदूंना अभिव्यक्ती स्वातंत्र्याविषयी बोलतांना अटी घालण्यात आल्या आहेत का ?’, असे ट्वीट केले आहे.

२. काही लोकांनी म्हटले की, मुख्य कार्यकारी अधिकारी नवीन असले, तरी ट्विटरची कार्यपद्धत हुकूमशाही पद्धतीचीच आहे.