उत्तरप्रदेशात प्रतिदिन गायब होतात ३ मुली !

१२ ते १८ वयोगटांतील मुलींची संख्या सर्वाधिक

  • अशा प्रकारे मुली बेपत्ता होत असतांना राज्यातील पोलीस युद्धपातळीवर हा प्रकार रोखण्यासाठी किंवा बेपत्ता झालेल्यांना शोधण्यासाठी प्रयत्न करत नाहीत, हे लज्जास्पद ! – संपादक
  • मुलींचे बेपत्ता होण्यामागे ‘लव्ह जिहाद’ असण्याची शक्यता नाकारता येत नाही. उत्तरप्रदेशमध्ये भाजपचे सरकार असल्याने याकडे अधिक गांभीर्याने पहाण्याची आवश्यकता आहे, असे हिंदूंना वाटते ! – संपादक

आगरा (उत्तरप्रदेश) – उत्तरप्रदेश राज्यात वर्ष २०२० मध्ये १ सहस्र ७६३ मुले  बेपत्ता झाली आहेत. विशेष म्हणजे यांमध्ये १ सहस्र १६६ मुली आहेत, म्हणजे उत्तरप्रदेश राज्यात प्रतिदिन ३ मुली बेपत्ता होतात. ही आकडेवारी माहिती अधिकारातून उघड झाली आहे. ५० जिल्ह्यांतील माहिती अधिकारांतून ही माहिती मिळाली आहे.

१. उत्तरप्रदेश पोलिसांनी सांगितले की, बेपत्ता झालेल्या मुलींपैकी १ सहस्र ८० मुलींचे वय १२ ते १८ वर्षे आहे. यांपैकी ९६६ मुलींचा शोध घेण्यात आला; मात्र अद्याप २०० मुलींविषयी कुठलीही माहिती मिळालेली नाही.

२. आगरा येथील माहिती अधिकार कार्यकर्ते आणि बाल अधिकार कार्यकर्ते नरेश पारस यांनी माहितीच्या अधिकारात ही माहिती मिळावली आहे. ते म्हणाले की, काही जिल्ह्यांतील पोलिसांनी माहिती अधिकाराद्वारे माहिती देण्यास थेट नकार दिला. मुलांचे अशा प्रकारे बेपत्ता होणे, ही चिंतेची गोष्ट आहे. मुले बेपत्ता होऊन ४ मास झाले आणि त्यांच्याविषयी कोणत्याही प्रकारची माहिती मिळू शकली नाही, तर ती प्रकरणे मानवी तस्करीविरोधी विभागाकडे सोपवण्याची तरतूद आहे. असे असूनही बेपत्ता मुलांची संख्या वाढत आहे.