|
पिंपरी-चिंचवड (जिल्हा पुणे) – पिंपरी-चिंचवड शहर परिसरात चोरीच्या आणखी ८ घटना उघडकीस आल्या आहेत. एम्.आय.डी.सी. भोसरी, पिंपरी, देहूरोड, चाकण, हिंजवडी, सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत या घटना घडल्या असून यात एम्.आय.डी.सी. भोसरी, पिंपरी, देहूरोड येथून भ्रमणभाष, रोख रक्कम, सोने, हिर्यांचे दागिने, दुचाकी, पाण्याची मोटर, वायरी असा एकूण २ लाख ७० सहस्र ७०० रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे. पोलीस या घटनांचे अधिक अन्वेषण करत आहेत.