सनातनच्या रामनाथी (गोवा) येथील आश्रमात झालेल्या ‘राजमातंगी यज्ञा’च्या वेळी आजूबाजूच्या पक्ष्यांविषयी साधिकेला जाणवलेली सूत्रे

१. यज्ञाच्या वेळी साधक प्रार्थना करत असतांना झाडावर बसलेल्या पोपटाने आवाज केल्यावर ‘देवीने साधकांच्या प्रार्थना स्वीकारल्या आहेत’, असे जाणवणे

कु. प्रतीक्षा हडकर

‘रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात करण्यात आलेल्या ‘राजमातंगी यज्ञा’च्या वेळी निषाददादा (सनातनचे ज्ञानप्राप्तकर्ते साधक श्री. निषाद देशमुख (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के)) प्रार्थना सांगत होता आणि सर्व साधक त्याने सांगितलेली प्रार्थना म्हणत होते. त्या वेळी प्रार्थनेतील प्रत्येक वाक्याच्या वेळी झाडावर बसलेला एक पोपट आवाज करत होता. तेव्हा ‘देवीने साधकांच्या प्रार्थना स्वीकारल्या आहेत, म्हणजेच प्रत्येक प्रार्थना देवीच्या चरणी पोचत आहे’, असे मला जाणवत होते.

२. मंत्रपठण चालू असतांना ‘औदुंबराच्या झाडावर बसलेल्या पक्ष्यांना आनंद होऊन ते मंजुळ स्वरात गात आहेत’, असे वाटणे

आश्रमाच्या आवारातील औदुंबराच्या झाडावर काही पक्षी आनंदाने गात होते. ज्या वेळी मंत्रपठण चालू होते, त्या वेळी पक्ष्यांना पुष्कळ आनंद होत होता. जणू ते सुंदर आणि मंजुळ स्वरात गात होते अन् आनंद व्यक्त करत होते. त्यांच्या मधुर आवाजाने साधकांनाही चांगले वाटत होते.’

– कु. प्रतिक्षा हडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (६.५.२०१९)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक