पिंपरी-चिंचवडमधून साडेसात लाखांचा ३० किलो गांजा जप्त, दोघांना अटक !

लाखो रुपयांचा गांजा जप्त होणे हे सुरक्षेच्या दृष्टीने चिंताजनक ! – संपादक

प्रतीकात्मक छायाचित्र

पिंपरी-चिंचवड (जिल्हा पुणे) – पिंपरी-चिंचवड शहरात बाळू वाघमारे आणि रवींद्र घाडगे यांच्याकडून ७ लाख ५४ सहस्रांचा ३० किलो गांजा अमली पदार्थ विरोधी पथक गुन्हे शाखा यांनी जप्त केला आहे. दोन्ही आरोपींनी शिरपूर, धुळे येथून राजू नावाच्या व्यक्तीकडून ठोक स्वरूपात ३० किलो गांजा आणला.