मुंबईवरील आक्रमणानंतर पाकविरोधात कारवाई न करणे, ही तत्कालीन काँग्रेस सरकारची दुर्बलता होती !

काँग्रेसचे नेते मनीष तिवारी यांच्या पुस्तकातून काँग्रेसला घरचे अहेर !

हे सांगायला काँग्रेस नेते मनीष तिवारी यांना इतकी वर्षे का लागली ? त्याच वेळी त्यांनी हे का सांगितले नाही ? आता स्वतःचे पुस्तक विकले जावे; म्हणून ते असे सांगत आहेत, हेच स्पष्ट होते ! – संपादक

काँग्रेसचे नेते मनीष तिवारी

नवी देहली – मुंबईवरील २६ नोव्हेंबर २००८ च्या आक्रमणानंतर भारताने पाकिस्तानच्या विरोधात कठोर पावले उचलायला हवी होती. ती प्रत्यक्ष कारवाई करण्याची वेळ होती. पाकिस्तानसारखा एक देश निर्दोष लोकांचा नरसंहार करतो आणि त्याला पश्‍चातापसुद्धा होत नाही. यानंतरही आपण संयम बाळगत असू, तर हे दुर्बलतेचे लक्षण आहे, अशी टीका काँग्रेसचे नेते मनीष तिवारी यांनी त्यांच्या नव्या पुस्तकात तत्कालीन काँग्रेस सरकारवर केली. या आक्रमणात १६० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता, तर ३०० हून अधिक लोक घायाळ झाली होते.