भारतीय क्रिकेट खेळाडूंना हलाल मांस देण्याच्या निर्णयास ट्विटरवरून धर्मप्रेमींचा विरोध

‘#BCCI_Promotes_Halal’ हा ‘हॅशटॅग ट्रेंड’ राष्ट्रीय ‘ट्रेंड’मध्ये दुसर्‍या क्रमाकांवर !

‘हॅशटॅग ट्रेंड’ म्हणजे एकाच विषयावर चर्चा घडवून आणणे

नवी देहली – भारत आणि न्यूझीलंड या देशांच्या क्रिकेट संघांमध्ये कसोटी मालिकांचे आयोजन करण्यात आले आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने या कालावधीत भारतीय खेळाडूंच्या आहाराविषयी सूची बनवली आहे. त्यात गोमांस आणि डुकराचे मांस वर्ज्य करण्यात आले आहे, तर अन्य कोणतेही मांस हे ‘हलाल’ मांस असणार आहे. मंडळाच्या या निर्णयाला विरोध केला जात आहे. सामाजिक माध्यमांतूनही याला विरोध केला जात आहे. २३ नोव्हेंबर या दिवशी धर्मप्रेमींकडून ट्विटरवर ‘#BCCI_Promotes_Halal’ हा ‘हॅशटॅग ट्रेंड’ करण्यात आला होता. काही कालावधीतच तो राष्ट्रीय ‘ट्रेंड’मध्ये दुसर्‍या क्रमाकांकावर आला. यावर ३० सहस्रांहून अधिक लोकांनी ट्वीट करून भारतीय खेळाडूंना हलाल मांस देण्याच्या निर्णयास विरोध केला. क्रिकेड मंडळाकडून याविषयी अद्याप तरी कोणतीही अधिकृत स्पष्टीकरण आलेले नाही.