श्री. मयूर फडके यांचा वाढदिवस कार्तिक कृष्ण पक्ष चतुर्थी म्हणजे २३.११.२०२१ या दिवशी आहे. त्यानिमित्त त्यांच्या पत्नीला जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.
श्री. मयूर फडके यांना वाढदिवसाप्रीत्यर्थ सनातन परिवाराच्या वतीने शुभेच्छा !
१. मनमिळाऊ
माझे यजमान श्री. मयूर अत्यंत मनमिळाऊ स्वभावाचे आहेत. ते अनोळख्या ठिकाणी गेल्यावरही तेथील व्यक्तींशी सहजतेने ओळख करून घेऊन त्यांच्याशी बोलतात. त्यामुळे ते सर्वांनाच हवेहवेसे वाटतात.
२. प्रामाणिकपणा
अ. श्री. मयूर पूर्वी नोकरी करत होते. ते तेथील काम अत्यंत प्रामाणिकपणे करायचे. आता ते पौरोहित्याची कामेही प्रामाणिकपणे करतात. त्यामुळे अन्य पुरोहित त्यांना विश्वासाने कामे देतात. ज्या ठिकाणी ते पौरोहित्य करतात, तेथील यजमानांना त्यांचे काम आवडते.
आ. ते व्यष्टी आढावा देतांना त्यांच्याकडून झालेले आणि न झालेलेही प्रयत्न प्रामाणिकपणे सांगतात.
३. मनाचा निर्मळपणा
श्री. मयूर मनात जे असेल, ते मोकळेपणाने समोरच्या व्यक्तीला सांगतात. त्यांचे मन निर्मळ आहे.
४. श्री. मयूर समोरच्या व्यक्तीची चूक स्पष्टपणे आणि सहजतेने सांगतात.
५. साधे रहाणीमान
श्री. मयूर यांचे रहाणीमान पुष्कळ साधे आहे. त्यांना पाश्चात्त्य पोशाखापेक्षा भारतीय पोशाख परिधान करण्यास आवडते. नातेवाइकांत मिसळतांनाही त्यांना स्वतःच्या साध्या रहाणीमानाची लाज वाटत नाही.
६. सेवाभाव
श्री. मयूर त्यांना दिलेली सेवा लगेच स्वीकारतात. काही अडचण असेल, तर ते वेळ मागून घेतात आणि दिलेली सेवा परिपूर्ण अन् मनापासून करतात.
७. विचारण्याची वृत्ती
श्री. मयूर यांना एखादा निर्णय घेण्यास कठीण वाटत असेल, तर ते मलाही त्या निर्णयप्रक्रियेत समाविष्ट करतात. मी त्यांच्यापेक्षा वयाने लहान असूनही, तसेच त्यांच्यात पुरुषी अहंकार नसल्यामुळे ते माझे साहाय्य घेतात.
८. आधार देणे
मला व्यवहारज्ञान अल्प असल्यामुळे ते मला ‘योग्य कृती कशी करावी ?’ याविषयी सांगतात. ते मला सकारात्मक राहून आत्मविश्वासाने अवघड वाटणार्या कृती करण्यास साहाय्य करतात.
– सौ. मैथिली मयूर फडके, (पूर्वाश्रमीच्या कु. भावना देसाई) (श्री. मयूर फडके यांच्या पत्नी) शिरोडा, गोवा. (२.१०.२०२१)