पठाणकोटमधील सैन्यतळाच्या प्रवेशद्वारावर ग्रेनेडद्वारे आक्रमण

वर्ष २०१६ मध्येही झाले होते आक्रमण !

‘आतंकवाद्यांची निर्मितीकेंद्र असलेल्या पाकला नष्ट केल्यासच अशी आक्रमणे कायमची थांबतील’, हे लक्षात घेऊन सरकारने आता तरी आतंकवाद्यांचा नायनाट करावा, अशी जनतेची अपेक्षा ! – संपादक

पठाणकोट (पंजाब) – येथील सैन्यतळाच्या प्रवेशद्वारावर आतंकवाद्यांनी ग्रेनेडचा स्फोट घडवून आणला. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. दुचाकीवरून आलेल्या आतंकवाद्यांनी प्रवेशद्वाराच्या दिशेने हा ग्रेनेड फेकला. या वेळी प्रवेशद्वाराजवळून एक वरात जात होती. ‘सीसीटीव्ही फुटेज्’च्या आधारे आतंकवाद्यांचा शोध चालू आहे. या भागात वायूदलाचे तळ, सैन्यदलाचा दारुगोळा डेपो आणि सैन्याच्या तुकड्यांचे तळ आहे. जानेवारी २०१६ मध्ये जिहादी आतंकवाद्यांनी वायूदलाच्या तळावर आक्रमण केले होते. यात ८ सैनिक हुतात्मा झाले होते, तर ५ आतंकवादी ठार झाले होते.