वस्तू खरेदी करतांना किंवा वापरतांना ती सात्त्विक रंगाची निवडणे श्रेयस्कर !

परात्पर गुरु डॉ. आठवले

‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या स्नानगृहातील अंघोळीसाठी वापरण्यात येणारी प्लास्टिकची जुनी थोडी काळसर हिरव्या रंगाची बालदी माझ्याकडून खाली पडून तुटली. त्यामुळे त्यांनी मला दुसरी बालदी आणण्यास सांगितले. मी दुसरी बालदी घेऊन त्यांच्या खोलीत गेले. त्या बालदीचा रंग गडद गुलाबी होता. तो पाहून परात्पर गुरुदेवांनी मला सात्त्विक रंगाची बालदी आणण्यास सांगितले. त्यानंतर मी पांढर्‍या रंगाची बालदी घेऊन आले. त्यानंतर त्यांनी दोन्ही बालद्यांची ‘यू.ए.एस्.’ उपकरणाद्वारे चाचणी करण्यास सांगितले. या निरीक्षणांतून गडद गुलाबी रंगाच्या बालदीमध्ये सकारात्मक ऊर्जा काहीच नसून पुष्कळ नकारात्मक ऊर्जा असल्याचे आढळून आले. गडद गुलाबी रंगाच्या बालदीच्या तुलनेत पांढर्‍या रंगाच्या बालदीमध्ये नकारात्मक ऊर्जा अल्प प्रमाणात आढळून आली. बालदी प्लास्टिकची असल्यामुळे पांढर्‍या रंगाच्या बालदीमध्येही थोडी नकारात्मक ऊर्जा आढळून आली. गडद गुलाबी रंगाच्या बालदीकडे पाहून मला चांगले वाटले नाही; पण पांढर्‍या रंगाच्या बालदीकडे पाहून मला काही क्षण निर्गुण स्पंदने जाणवली. यातून ‘कोणतीही वस्तू खरेदी करतांना ती निळा, पिवळा, पांढरा इत्यादी सात्त्विक रंगाची निवडणे का आवश्यक आहे ?’, हे मला शिकायला मिळाले.’

– एक साधिका, सनातन आश्रम, रामनाथी. (११.११.२०२१)