विदर्भात शेतकर्‍यांचा असंतोष असल्याने शरद पवार यांनी येऊ नये ! – अनिल बोंडे, नेते, भाजप

श्री. अनिल बोंडे

अमरावती – १७ नोव्हेंबर या दिवशी मी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना विनंती केली होती की, येथे शेतकर्‍यांचा असंतोष आहे. शेतकर्‍यांना पैसे आणि साहाय्य मिळालेले नाही, धानाला बोनस घोषित झाला नाही, संत्र्यांची हानीभरपाई मिळाली नाही. एस्.टी. कामगारांचा संप चालू असल्याने असंतोष आहे. त्यामुळे त्यांनी येथे येऊ नये. असंतोष आणि अस्वस्थता त्यांना त्यांच्या नागपूरच्या दौर्‍यात दिसली असेल. त्यामुळे त्यांची अस्वस्थता वाढली असल्याने त्यांनी वर्धा आणि यवतमाळ येथील दौरा रहित केला आहे, अशी टीका भाजपचे नेते डॉ. अनिल बोंडे यांनी १८ नोव्हेंबर या दिवशी येथे केली.

ते पुढे म्हणाले की, माझी आधुनिक वैद्य या नात्याने शरद पवार यांना विनंती आहे की, त्यांनी त्यांच्या प्रकृतीची काळजी घ्यावी; कारण विदर्भातील हवामान राष्ट्रवादी काँग्रेसला पोषक नाही.