उतारवयातही साधकांना साहाय्य करणारे आणि तळमळीने सेवा करणारे पेण (जिल्हा रायगड) येथील श्री. जगन्नाथ शिवराम जांभळेगुरुजी (वय ६९ वर्षे) !

श्री. जगन्नाथ शिवराम जांभळेगुरुजी

१. नम्रता

‘जांभळेगुरुजी नम्र आहेत. त्यांच्यात ऐकण्याची वृत्ती आहे.’ – सौ. अभया उपाध्ये, पेण

२. व्यवस्थितपणा

‘ते सेवेतील प्रत्येक सूत्र व्यवस्थित लिहितात. त्यांची वही पहाण्यासारखी आहे.’ – श्री. मनीष माळी, पेण आणि श्री. दिलदास म्हात्र, पेण

३. ‘ते नेहमी सकारात्मक आणि उत्साही असतात. ’ – सौ. अभया उपाध्ये

४. प्रेमभाव

अ. ‘गुरुजी आमच्या घरी आल्यावर सर्वांची आपुलकीने विचारपूस करतात.’ – श्री. दिलदास म्हात्रे

आ. ‘दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये आलेल्या सूचना सर्व साधकांना समजाव्यात’, यासाठी गुरुजी त्याच्या प्रती काढून सर्वांना देतात.’ – श्री. अरुण भोईर, पेण

इ. ‘साधकांना काही अडचण असल्यास गुरुजी त्यांना प्रेमाने साहाय्य करतात.’ – श्री. मनीष माळी आणि श्री. अरुण भोईर

ई. ‘मला सेवेहून घरी जायला उशीर होत असल्यास गुरुजी प्रथम मला घरी सोडतात.’ – श्री. मनीष माळी

५. दैनिक ‘सनातन प्रभात’ वाचण्याची तळमळ

‘माझ्या घरापासून गुरुजींचे घर ८ कि.मी. अंतरावर आहे. त्यांचा दैनिक ‘सनातन प्रभात’चा अंक माझ्या घरी ठेवलेला असतो. ते प्रतिदिन दैनिक ‘सनातन प्रभात’ नेण्यासाठी इतक्या लांब येतात.

६. सेवेची तळमळ

अ. ‘ते सात्त्विक उत्पादनांचे वितरण करणे, साप्ताहिक ‘सनातन प्रभात’चे वर्गणीदार करणे, अर्पण आणि विज्ञापने मिळवणे’, या सेवा तळमळीने करतात.

आ. गुरुजी या वयातही रात्रीच्या वेळी प्रवचन करण्यास दुचाकीवरून बाहेरगावी जातात.

इ. गुरुजी दिवाळीत परिचित व्यक्तींना भेटून त्यांना सात्त्विक उत्पादने आणि ग्रंथ यांचे भेटसंच घेण्यास उद्युक्त करतात.’ – श्री. अरुण भोईर

ई. ‘गुरुजींना कधीही सेवेसाठी संपर्क केला, तरी ते सेवेसाठी तत्परतेने येतात.’ – श्री. दिलदास म्हात्रे

७. विचारण्याची वृत्ती

गुरुजी वयाने किंवा अनुभवाने मोठे असले, तरी ते सेवेतील बारकावे विचारून सेवा करतात.’ – श्री. मनीष माळी

८. स्वीकारण्याची वृत्ती

‘गुरुजींना त्यांच्यापेक्षा वयाने लहान असलेल्या साधकांनी त्यांची चूक सांगितली, तरी ते शांतपणे स्वीकारतात.’ – श्री. अरुण भोईर आणि श्री. दिलदास म्हात्रे

९. भाव

अ. एकदा दुचाकीवरून सेवेसाठी जातांना गुरुजी दुचाकीवरून खाली पडले, तरी त्यांना काहीच लागले नाही. त्या वेळी मी त्यांना म्हणालो, ‘‘गुरुजी, तुमच्यावर गुरुदेवांची कृपा आहे.’’ तेव्हा ते म्हणाले, ‘‘गुरुदेवांनीच मला झेलले आहे.’’

आ. गुरुजींना कोणत्याही साधकाने सेवा सांगितली, तरी ते ‘गुरुदेवांना आवडेल’, या भावाने सेवा करतात.’ – श्री. दिलदास म्हात्रे

१०. जाणवलेले पालट

गुरुजी रामनाथी आश्रमात स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया शिकण्यासाठी गेले होते. त्यानंतर त्यांच्या स्वभावात झालेले पालट पुढे दिले आहेत.

अ. पूर्वी ते मोठ्या आवाजात बोलायचे. आता ते शांतपणे आणि हळू आवाजात बोलतात.

आ. त्यांच्या व्यष्टी साधनेच्या प्रयत्नात सातत्य जाणवते.

इ. ते त्यांच्याकडून सेवेत झालेल्या चुका विचारतात.’ – श्री. मनीष माळी (१२.२.२०२०)