कै. संजय कुलथे यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ घाटकोपरच्या शिवाजी शिक्षण संस्थेला सनातन संस्थेचे ग्रंथ भेट !

शाळेत ग्रंथ भेट देतांना १. श्रीमती अनिता कुलथे, समवेत २. सौ. नयना भगत

मुंबई, १८ नोव्हेंबर (वार्ता.) – घाटकोपर येथील शिवाजी शिक्षण संस्थेच्या इंग्रजी माध्यमाच्या माध्यमिक विभागाला येथील श्रीमती अनिता कुलथे यांनी सनातन संस्थेचे ५४ ग्रंथ भेट दिले. या ग्रंथांमध्ये संस्कार, व्यक्तिमत्त्व विकास, पालकत्व, राष्ट्र आणि अन्य विषयांवरील ग्रंथाचा समावेश आहे. श्रीमती अनिता कुलथे यांनी त्यांचे दिवंगत पती संजय कुलथे यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ हे ग्रंथ शाळेला भेट दिले.

सनातन संस्थेच्या ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियानां’तर्गत सनातन संस्थेच्या सौ. नयना भगत आणि श्री. सतीश सोनार यांनी श्रीमती अनिता कुलथे यांची भेट घेतली होते. तेव्हाच त्यांनी हे ग्रंथ शाळेला भेट देण्याचे ठरवले. शाळेच्या शिक्षकांनी याविषयी श्रीमती कुलथे यांचे कौतुक करून धन्यवाद दिले. तसेच मुलांसाठी व्यक्तिमत्त्व विकास आणि संस्कार या विषयांच्या अनुषंगाने व्याख्यान घेण्यासाठी सनातन संस्थेच्या प्रवक्त्या सौ. नयना भगत यांना सुचवले.

घाटकोपर येथील मनसेचे माजी विभाग अध्यक्ष कै. संजय कुलथे हे सनातन संस्थेच्या कार्याशी जोडलेले होते. त्यांना राष्ट्र-धर्माची आवड होती. ते साप्ताहिक ‘सनातन प्रभात’चे वाचक होते. सनातनच्या कार्यात त्यांचे नेहमीच सहकार्य असायचे. काही मासांपूर्वी त्यांचे कोरोनामुळे निधन झाले.