परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितलेल्या स्वभावदोष निर्मूलनाच्या प्रक्रियेतील स्वयंसूचना दिल्याने स्वच्छता कामगाराने अचानक सुट्टी घेतल्यावर पूर्वीसारखा ताण न येणे

‘माझ्या रुग्णालयातील एक स्वच्छता कामगार अचानक सुट्टी घेतो. त्यामुळे मला ताण येतो. रुग्णालयाच्या नियमानुसार ‘सुट्टी घेण्याआधी त्याने कळवणे आवश्यक आहे’; परंतु हा नियम त्याला वारंवार सांगूनही तो तीच चूक पुनःपुन्हा करत असे. या चुकीच्या संदर्भात मी आरंभी त्याला समजावून सांगितले, नंतर रागावून पाहिले आणि त्यानंतर त्याच्या वेतनात कपातही केली, तरीही त्याच्या वागणुकीत पालट होत नव्हता. स्वच्छता कामगार सहजासहजी मिळत नसल्याने मला त्याला कामावरून काढून टाकणे शक्य नव्हते. अशा वेळी मी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितलेल्या स्वभावदोष निर्मूलनाच्या प्रक्रियेच्या अंतर्गत असलेली ‘आ २’ स्वयंसूचना पद्धत वापरली. ‘स्वच्छता कामगाराची प्रकृतीच तशी आहे. त्यामुळे तो तसा वागत आहे. त्याच्या या वागण्याकडे मी साक्षीभावाने पाहीन आणि त्याने अचानक सुट्टी घेतली, तर मी पर्यायी उपाययोजना करीन’, अशी मी स्वयंसूचना दिल्यापासून मला या गोष्टीचा ताण येणे बंद झाले. त्यामुळे आता त्या स्वच्छता कामगाराने जरी अचानक सुट्टी घेतली, तरी मला आता त्याचा ताण येत नाही. कृतज्ञता !’

– डॉ. रवींद्र भोसले, नगर (२५.३.२०२१)