सौ. वैशाली मुद्गल यांच्या नावाचा देवाने सुचवलेला अर्थ
वै – वैजयंती माळेने सतत जप करणारी माझी आई ।
शा – शांत राहून प्रत्येक प्रसंग स्वीकारणारी माझी आई ।
ली – लीन होऊन साधनेचे प्रयत्न गांभीर्याने करणारी माझी आई ।
गुणवैशिष्ट्ये
१. ‘आईला आध्यात्मिक त्रासामुळे रात्रभर झोप लागत नाही; पण ती सकाळी लवकर उठून सेवेला जाते.
२. आईला आध्यात्मिक त्रासावर उपाय म्हणून जो नामजप सांगितला आहे, तो ती आज्ञापालन म्हणून करते.
३. मुलींना साधनेत साहाय्य करणे : आमच्याकडून काही चुकले, तर ती चूक सांगून आम्हाला साधनेत साहाय्य करते. मला रात्रभर झोप येत नाही. तेव्हा आई मला सांगते, ‘‘तू सकाळी सेवेला जात जा, म्हणजे तुला चैतन्य मिळेल.’’ ‘माझी साधना व्हावी’, असे माझ्यापेक्षा अधिक माझ्या आईलाच वाटते. मी कधी नकारात्मक विचारात असल्यास ती मला सकारात्मक करते. त्यामुळे मला उत्साह वाटून मी आनंदी होते.
४. आईला सजीव आणि निर्जीव वस्तूंविषयी कृतज्ञता वाटते.
५. संत आईचे कौतुक करतात. ते म्हणतात, ‘‘अनिष्ट शक्तींचा त्रास असूनही ती नेहमी आनंदी असते.’’
– कु. गौरी मुद्गल, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२१.१०.२०२०)
|