जामनगर (गुजरात) येथील पं. नथुराम गोडसे यांच्या पुतळ्याची काँग्रेसकडून तोडफोड

काँग्रेसची ही गांधीगिरी म्हणायची का ? उठताबसता गांधींच्या अहिंसेचे तत्वज्ञान सांगणारे काँग्रेसी प्रत्यक्षात हिंसाचारी मनोवृत्तीचीच आहे, हे वर्ष १९४८ मध्ये ब्राह्मणांच्या आणि वर्ष १९८४ मध्ये शिखांच्या हत्यांमधून यापूर्वीच दिसून आले आहे ! आता हेच पुन्हा एकदा सिद्ध झाले ! – संपादक 

पं. नथुराम गोडसे यांच्या पुतळ्याची काँग्रेसकडून तोडफोड

जामनगर (गुजरात) – येथील काँग्रेसचे अध्यक्ष दिभुगा जडेजा यांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी हिंदु सेनेने उभारलेल्या पंडित नथुराम गोडसे यांच्या पुतळ्याची तोडफोड केली. या कार्यकर्त्यांनी पुतळ्याभोवती भगवे कापड लावून तो त्याची तोडफोड केली.

हिंदु सेनेने ऑगस्टमध्ये जामनगरमध्ये पंडित नथुराम गोडसे यांचा पुतळा बसवण्याचा निर्णय घोषित केला होता; मात्र स्थानिक अधिकार्‍यांनी जागा देण्यास नकार दिल्यानंतर या संघटनेने ‘नथुराम गोडसे अमर रहे’चा नारा देत हनुमान आश्रमात तो उभारला होता.

  • हिदु महासभा ग्वाल्हेर येथे पंडित नथुराम गोडसे यांचा पुतळा उभारणार

  • पुतळ्या सिद्ध करण्यासाठी गोडसे यांना फाशी दिलेल्या अंबाला येथील मध्यवर्ती कारागृहातील मातीचा वापर करणार

हरियाणाच्या अंबाला मध्यवर्ती कारागृहातून आणलेल्या मातीच्या साहाय्याने नथुराम गोडसे यांचा पुतळा बनवणार असल्याची माहिती हिंदु महासभेने दिली. याच कारागृहामध्ये वर्ष १९४९ मध्ये नथुराम गोडसे आणि नारायण आपटे यांना फाशी देण्यात आली होती. हा पुतळा ग्वाल्हेर येथील हिंदु महासभेच्या कार्यालयात बसवला जाणार आहे, असे हिंदु महासभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. जयवीर भारद्वाज यांनी सांगितले.