आगरा येथे मुसलमानाशी विवाह करणार्‍या हिंदु तरुणीचा संशास्पदरित्या मृत्यू

  • दोन गटांत हिंसाचार

  • दगडफेक आणि गोळीबार

लव्ह जिहादचा आणखी एक बळी, असेच या घटनेला म्हणता येईल ! अशा घटना कधी रोखल्या जाणार ? – संपादक
(प्रतिकात्मक छायाचित्र)

आगरा (उत्तरप्रदेश) – येथील शाहगंज भागात एका हिंदु तरुणीने वर्षभरापूर्वी एका मुसलमान तरुणाशी विवाह केल्यानंतर आता तिचा संशयास्पद मृत्यू झाल्यामुळे येथे हिंसाचाराची घटना घडली. या वेळी दगडफेक आणि गोळीबार करण्यात आला.

१. वर्षा नावाच्या हिंदु तरुणीने एक वर्षांपूर्वी अरमान नावाच्या मुसलमान तरुणाशी प्रेमविवाह केला होता. दोघेही घरातून पळून गेले होते. हे दोघे आगार्‍याच्या चिल्ली पाडा येथे रहात होते. येथेच वर्षाचा मृतदेह गळफास घेतलेल्या स्थितीत आढळला, तर अरमान पसार झाल्याचे समोर आले. वर्षाचा भाऊ दुष्यंत याने म्हटले की, माझी बहीण आत्महत्या करू शकत नाही. तिची हत्या करण्यात आली आहे.

२. पोलीस अधीक्षक सुधीर कुमार यांनी सांगितले की, या मृत्यूची चौकशी केली जात असून दोषी व्यक्तीला सोडणार नाही.