गुजरातमध्ये पाकिस्तानातून समुद्रमार्गे आलेले ३०० कोटी रुपये किमतीचे अमली पदार्थ जप्त

प्रतिकात्मक छायाचित्र

गांधीनगर (गुजरात) – गुजरात पोलिसांनी द्वारका जिल्ह्यामध्ये ३०० कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले. काही आठवड्यांपूर्वी कच्छमधील मुंद्रा बंदरावर २१ सहस्र कोटी रुपये किमतीचे जवळपास ३ सहस्र किलो रुपयांचे अमली पदार्थ सापडले होते. त्यानंतरची ही दुसरी मोठी कारवाई आहे. हे अमली पदार्थ पाकिस्तानातून समुद्रीमार्गे गुजरातमध्ये आणले जात होते, असे सांगितले जात आहे.

१. या प्रकरणी सज्जाद याला पकडण्यात आले. त्याच्याकडे १९ पाकिटे सापडली. तो ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा येथील रहाणारा आहे. तो तेथे भाजीविक्रीचा व्यवसाय करतो. त्याला गुजरातच्या जामनगर येथे रहाणार्‍या सलीम याकुब करा आणि अली याकुब करा या दोघांनी अमली पदार्थ दिल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर या दोघांच्या घरावर छापा मारून ४७ पाकिटे जप्त करण्यात आली.

२. सज्जाद हा एका हत्येच्या प्रकरणात कारागृहात होता. सलीम करा याला यापूर्वी अमलीपदार्थविरोधी कायद्यान्वये कारवाई करून अटक करण्यात आली होती, तसेच बनावट नोटा आणि शस्त्र बाळगल्याच्या प्रकरणीही त्याच्याविरोधात कारवाई करण्यात आली होती. (अल्पसंख्यांकांचे गुन्हेगारीत सर्वाधिक प्रमाण ! गुन्हेगारी कारवायांमध्ये धर्मांधांना अटक करून कारागृहात टाकल्यानंतर त्यांच्यावर काहीही परिणाम होत नाही आणि ते कारागृहातून बाहेर आल्यावर कारवाया करत रहातात, हेच यातून लक्षात येते ! अशांना आजन्म सश्रम कारावासाची शिक्षा केली पाहिजे ! – संपादक)