पहाटे होणार्‍या अजानमुळे साधू-संत यांच्या साधनेत व्यत्यय येतो ! – भाजपच्या खासदार प्रज्ञासिंह ठाकूर

मध्यप्रदेशात आणि केंद्रातही भाजपचे सरकार असतांना साधू-संतांना असा त्रास होऊ नये, असेच हिंदूंना वाटते ! – संपादक 

भाजपच्या खासदार प्रज्ञासिंह ठाकूर

भोपाळ (मध्यप्रदेश) – इतर धर्मियांच्या प्रार्थनेच्या वेळी ‘मोठ्या आवाजात भजन, कीर्तन करू नका’ असे आपल्याला (हिंदूंना) सांगितले जाते; पण हे लोक (मुसलमान) पहाटे अजान देऊन लोकांची झोप मोड करतात. पहाटे ५ वाजता अजानमुळे लोकांची झोप उडते. रुग्णांना त्रास होतो. साधू-संतांची बहाटे पूर्जा-अर्चा किंवा ध्यान साधना चालू असते. त्यातही व्यत्यय येतो. आरतीची वेळदेखील सकाळी असते आणि त्या वेळी यांचे भोंगे जोरजोरात वाजत असतात. त्याचा त्रास होतो, असे विधान येथील भाजपच्या खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी येथे वाल्मीकि समाजाच्या परिचय संमेलनात केले. ‘आम्ही हिंदू लोक सर्वधर्म समभावाचा सन्मान करतो; पण इतर कोणता धर्म असे वागतो का ?’, असेही त्या म्हणाल्या.