पुणे येथे फटाक्यांमुळे १२ ठिकाणी आग लागली !

फटाक्यांमुळे होणारी हानी पहाता त्यांवर बंदी घालण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे !

पुणे – या वर्षी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी म्हणजेच ४ नोव्हेंबरला मोठ्या प्रमाणात आतषबाजी करण्यात आली. सायंकाळी ६ वाजल्यानंतर रात्री उशिरापर्यंत शहरात ठिकठिकाणी आतषबाजी करण्याचे प्रकार चालू होते. त्यामुळे त्या दिवशी शहरात वेगवेगळ्या ठिकाणी १२ ठिकाणी आग लागण्याच्या घटना घडल्या. घराच्या छतांवर साठलेला पालापाचोळा, तसेच कचरा, झाडे यांवर पेटते फटाके पडल्याने आग लागली. अग्नीशमनदलाच्या कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली.