चीन पाकिस्तानला देणार ४ अत्याधुनिक युद्धनौका

  • चीनच्या कोणत्याही साहित्याची गुणवत्ता अत्यंत निकृष्ट असते, असे आतापर्यंत अनेक देशांनी अनुभवले आहे. भारताच्या शेजारी असणार्‍या नेपाळ आणि बांगलादेश यांनीही ते अनुभवले आहे. त्यामुळे आता पाकलाही तो अनुभव आल्यास आश्‍चर्य वाटू नये ! – संपादक
  • वर्ष १९६५ च्या भारत-पाक युद्धात पाककडे अमेरिकेने दिलेले ‘पॅटर्न’ रणगाडे होते; मात्र भारताने हे टँक उद्ध्वस्त केले होते. त्यामुळे कोणत्याही देशाने पाकला कोणतेही शस्त्र दिले, तरी भारतीय सैन्य ते नष्ट केल्याखेरीज रहाणार नाही ! – संपादक
प्रतिकात्मक छायाचित्र

बीजिंग (चीन) – चीन अत्याधुनिक ‘टाईप ०५४’ युद्धनौका  पाकिस्तानला देणार आहे. पुढील ३ वर्षांत चीन पाकला आणखी ३ युद्धनौका देणार आहे. याआधी चीनने पाकला ‘जेएफ्-१७  हे चौथ्या श्रेणीतील लढाऊ विमान विकसित करण्यास साहाय्य केले होते. जेएफ्-१७ हे पाकिस्तानच्या वायूदलाचे महत्त्वाचे लढाऊ विमान आहे.
‘टाईप ०५४’ ही अनुमाने ४ सहस्र टन वजनाची युद्धनौका जगातील अत्याधुनिक युद्धनौकांपैकी एक म्हणून ओळखली जाते. रडारवर पटकन शोधता येणार नाही, अशी या युद्धनौकेची रचना आहे. भूमीवर आणि हवेमध्ये विविध प्रकारची क्षेपणास्त्रे डागण्याची या युद्धनौकेची क्षमता असून पाणबुडीविरोधी कारवाईतही ही युद्धनौका उत्कृष्ट समजली जाते. अशा २५ पेक्षा अधिक युद्धनौका चीनच्या नौदलात कार्यरत आहेत.