खारीवाडो, वास्को येथील श्री महालक्ष्मी मंदिरातील ४ लक्ष रुपये किमतीच्या दागिन्यांची चोरी

हिंदूंच्या मंदिराची वाढती असुरक्षितता !

वास्को, ६ नोव्हेंबर (वार्ता.) – खारीवाडो, वास्को येथील श्री महालक्ष्मी मंदिरातील ४ लक्ष रुपये किमतीच्या दागिन्यांची चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. मंदिर समितीने या प्रकरणी वास्को पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली आहे.

प्राप्त माहितीनुसार ‘मुरगाव हिंदु समाजा’च्या ‘महालक्ष्मी उत्सव समिती’ने प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही खारीवाडो येथील मंदिरात लक्ष्मीपूजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या वेळी देवीच्या मूर्तीवर घालण्यात येणारे २ दागिने चोरीस गेल्याचे मंदिर समितीला ६ नोव्हेंबर या दिवशी सकाळी लक्षात आले.

कुंभवडे आणि करूळ या गावांतील २ मंदिरांतील दानपेट्या फोडल्या  

वैभववाडी – तालुक्यातील कुंभवडे आणि करूळ या २ गावांतील २ मंदिरांतील दानपेट्या ५ नोव्हेंबरच्या रात्री फोडून रोख रक्कम चोरण्यात आली. मंदिरांचे दरवाजे तोडून चोरांनी मंदिरात प्रवेश केला. याविषयी समजल्यानंतर ग्रामस्थांनी पोलीस ठाण्यात याची माहिती दिली.