खंडणी प्रकरणात पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना १३ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी

(उजवीकडे) बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे

मुंबई – मुंबईचे बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना खंडणीच्या प्रकरणात न्यायालयाने १३ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
गुन्हे गुप्तवार्ता विभागात (सी.आय.यू.) कार्यरत असतांना सचिन वाझे अन्वेषण करत असलेली बहुसंख्य प्रकरणे संशयास्पद असल्याचे पोलीस विभागाच्या अंतर्गत तपासणीत निष्पन्न झाले आहे. अशा २५ प्रकरणांचा तपास बंद करण्यात आला आहे. वाझे तपास करत असलेले तत्कालीन १५ गुन्हेही इतर विभागांकडे वर्ग करण्यात आले आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.

तळोजा कारागृहातून नजरकैदेत रहाण्यासाठी वाझे यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली होती. वाझे यांना नजरकैदेत ठेवण्यास राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एन्.आय.ए.) विरोध दर्शवला आहे.