‘आश्रमातील चैतन्यामुळे आणि संतांच्या अस्तित्वामुळे आश्रमात शक्ती, भाव, चैतन्य, आनंद आणि शांती यांच्या किंवा विशिष्ट देवतेच्या लहरी आकृष्ट होऊन कार्यरत होतात. त्या लहरी कशा प्रकारे आकृष्ट होऊन कार्यरत होतात, याचे एक प्रत्यक्ष उदाहरण, म्हणजे दीपावलीच्या कालावधीमध्ये सनातनच्या रामनाथी आश्रमात लावण्यात येणार्या पणत्यांतून प्रक्षेपित होणारा प्रकाश !
१. वर्ष २०१६ च्या दीपावलीच्या कालावधीमध्ये आश्रमात लावलेल्या पणत्यांच्या छायाचित्रांमध्ये पणत्यांच्या ज्योती लाल रंगाच्या दिसत होत्या. त्यामुळे आश्रमाच्या भिंतीही लाल रंगाच्या दिसत होत्या.
२. वर्ष २०१७ च्या दीपावलीच्या कालावधीमध्ये आश्रमात लावलेल्या पणत्यांच्या छायाचित्रांमध्ये पणत्यांच्या ज्योतींतून वातावरणात गुलाबी आणि निळसर रंगांच्या वर्तुळाकार प्रकाश वलयांचे प्रक्षेपण होत असल्याचे दिसून येते.
दिव्याच्या प्रकाशात विशिष्ट रंग आणि विशिष्ट सूक्ष्म स्पंदने संयुक्तपणे कार्यरत झाल्यामुळे किंवा त्या वस्तूतून वातावरणात तिच्या स्पंदनांप्रमाणे त्या त्या रंगांच्या प्रकाशाचे प्रक्षेपण होत असते. काळानुसार आश्रमातील प्रकाशलहरींमध्ये आनंद आणि भक्तीची स्पंदने प्रबळ असल्यामुळे त्या स्पंदनांनुसार अनुक्रमे गुलाबी किंवा निळसर रंगांच्या प्रकाशाचे प्रक्षेपण होत होते.
अशा भक्तीदायी आणि आनंदस्वरूप वातावरणातील ही रोषणाई पहाण्याचा आनंद अनुभवूया !’
– कु. प्रियांका लोटलीकर, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (३१.१०.२०१८)
सूक्ष्म: व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहे. |