अफगाणिस्तानमधील तालिबान सरकारकडून अमेरिकी डॉलरवर बंदी

तालिबान सरकारनेही अफगाणिस्तानमध्ये घातली अमेरिकी डॉलरच्या वापरावर पूर्णपणे बंदी

काबुल (अफगाणिस्तान) – अफगाणिस्तानवर तालिबानचे नियंत्रण आल्यापासून जागतिक संघटनांनी अफगाणिस्तानवर आर्थिक निर्बंध लादले आहेत. जागतिक बँक, तसेच अमेरिका आणि युरोप येथील बँका यांमध्ये अफगाणिस्तान सरकारने ठेवलेले पैसे गोठवण्यात आले आहे.

याला प्रत्युत्तर म्हणून तालिबान सरकारनेही अफगाणिस्तानमध्ये अमेरिकी डॉलरच्या वापरावर पूर्णपणे बंदी घातली आहे. नागरिकांना व्यवहार करण्यासाठी अफगाणिस्तानचेच चलन वापरण्याची सक्ती करण्यात आली आहे.