नाशिक पोलिसांकडून अट्टल साखळी चोराला अटक !

७१ तोळे सोने जप्त केले

अशा चोरांना कठोर शिक्षा केल्याविना चोरीच्या घटनांना आळा बसणार नाही ! – संपादक 

नाशिक पोलिसांनी एकूण ७ जणांना अटक केली

नाशिक – येथील २ पोलीस अधिकार्‍यांनी एका सराईत साखळी चोराला अटक करून त्याच्याकडून ५६ गुन्ह्यांची उकल करत ७१ तोळे सोन्यासह अनुमाने २९ लाख ३२ सहस्र १७६ रुपयांचा माल जप्त केला आहे. नाशिकच्या इतिहासात प्रथमच एवढ्या मोठ्या गुन्ह्याचा छडा लागल्याने पोलीस आयुक्तांनी २ पोलीस अधिकार्‍यांना रोख रक्कम देत त्यांचा सत्कार केला. आरोपी उमेश पाटील आणि त्याचा साथीदार तुषार ढिकले हे उच्चशिक्षित असून मैत्रिणीला समवेत घेऊन मौजमजा करण्यासाठी ते महिलांच्या सोन्याच्या साखळ्या चोरत होते. या प्रकरणी पोलिसांनी एकूण ७ जणांना अटक केली आहे.

गेल्या ३ वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणारा दंगल उपाख्य उमेश पाटील याला पोलिसांनी अटक केली. या प्रकरणात पोलिसांनी सराफ व्यावसायिक अशोक वाघ, मुकुंद बागुल आणि मुकुंद दयानकर यांनाही अटक करण्यात आली आहे. आरोपी पाटील हा ३ सराफांना सोन्याची साखळी विकत असे.