५ वर्षांच्या मूकबधिर मुलीवर बलात्कार करणार्‍या धर्मांधाला जन्मठेपेची शिक्षा

घटनेनंतर अवघ्या ४ मासांत निकाल !

  • अशा वासनांध धर्मांधांना फाशीची शिक्षा दिली पाहिजे, असेच जनतेला वाटेल ! – संपादक
  • जर या प्रकरणात अवघ्या ४ मासांत निकाल लागणे शक्य आहे, तर अन्य प्रकरणांमध्ये निकाल लागण्यास वर्षानुवर्षे का लागतात ? असा प्रश्‍न जनतेच्या मनात उपस्थित होतो !- संपादक
प्रतिकात्मक छायाचित्र

कैराना (उत्तरप्रदेश) – येथील विशेष ‘पॉक्सो’ न्यायालयाने ५ वर्षांच्या मूकबधिर मुलीवर बलात्कार करणार्‍याला साबिर नावाच्या दोषीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. ४ मासांपूर्वीही ही घटना घडली होती. १५ जून या दिवशी ही मुलगी रामपूर मनिहारन रेल्वे स्थानकावरील गर्दीमध्ये हरवली होती. त्या वेळी साबिर याने तिच्यावर बलात्कार केला होता.