काश्मीरमधील सीमेजवळ झालेल्या भूसुरुंगाच्या स्फोटात १ अधिकारी आणि १ सैनिक हुतात्मा

जोपर्यंत पाकिस्तानला नष्ट केले जात नाही, तोपर्यंत अशा घटना रोखणे कठीण आहे, हे आता लक्षात घेणे आवश्यक ! – संपादक

लेफ्टनंट ऋषी कुमार आणि शिपाई मनजीत सिंह

श्रीनगर – काश्मीरच्या नौशेरा-सुंदरबनी सेक्टरमध्ये नियंत्रणरेषेजवळ झालेल्या भूसुरुंगाच्या स्फोटात लेफ्टनंट ऋषी कुमार आणि शिपाई मनजीत सिंह हे हुतात्मा झाले, तर अन्य ३ घायाळ झाले. नियंत्रणरेषेजवळ भारतीय सैनिक गस्त घालत असतांना पाक सैनिकांनी पुरलेल्या भूसुरुंगावर सैनिकांचा पाय पडल्याने स्फोट झाला. लेफ्टनंट ऋषी कुमार हे बिहारमधील बेगुसरायचे रहिवासी होते, तर शिपाई मनजीत सिंह हे पंजाबमधील भटिंडा येथील रहिवासी होते.