अयोध्येमध्ये साधूचा वेश धारण करून भीक मागणार्‍या दोघा मुसलमानांना अटक !

हिंदू कधी फकिराचा वेश धारण करून भीक मागतात का ? मग धर्मांधांकडून हा प्रकार का केला जात आहे ? ‘हिंदूंकडून भीक घेण्यासाठी कि घातपात करण्यासाठी ?’, हे उघड झाले पाहिजे ! – संपादक

साधूचा वेश धारण करून भीक मागणार्‍या दोघा मुसलमानांना अटक

अयोध्या (उत्तरप्रदेश) – येथे भगवा वेश परिधान केलेल्या दोघा साधूंना पोलिसांनी अटक केली. हे दोघेही मुसलमान असून सुद्दू आणि मुहर्रम अशी त्यांची नावे आहेत. ते शेजारील सुलतानपूर जिल्ह्यात रहाणारे आहेत. दीपावलीच्या पार्श्‍वभूमीवर अयोध्येमध्ये आतंकवाद्यांकडून घातपात होऊ नये, यासाठी पोलीस सतर्क असतांना त्यांनी या दोघांना पकडले. त्यांच्याविषयी अधिक माहिती घेतली जात आहे.

हे दोघे येथे भीक मागत असतांना पोलिसांनी त्यांना चौकशीसाठी थांबवले.  त्यांच्या हालचालीवरून पोलिसांना त्यांचा संशय आला. त्यांच्या चौकशीत ते मुसलमान असल्याचे समजले. त्यांनी सांगितले की, त्यांच्या गावातील अन्य काही जण अनेक वर्षांपासून साधू बनून भीक मागत आले आहेत.