फ्रान्समध्ये जिहादला प्रोत्साहन देणारी मशीद ६ मासांसाठी बंद

गेली ३ दशके भारतात आतंकवादी कारवाया चालू असतांना अशा प्रकारची कारवाई कधीच झाली नाही, हे लक्षात घ्या ! – संपादक

फ्रान्समध्ये जिहादला प्रोत्साहन देणारी मशीद

पॅरिस (फ्रान्स) – आतंकवादी आक्रमणाला वैध ठरवणे आणि कट्टरतावाद्यांना आश्रय देणे यांवरून फ्रान्समध्ये एका मशिदीला, तसेच या मशिदीकडून चालवण्यात येणार्‍या इस्लामी शाळेला ६ मासांसाठी बंद करण्यात आले आहे. फ्रान्सचे गृहमंत्री गेराल्ड डारमॅनिन यांनी ही माहिती दिली. मशिदीच्या प्रशासकांची बँक खाती गोठवण्यात आली आहेत. शाळेतून सशस्त्र जिहादला प्रोत्साहन देण्यात येत होते, असे सांगण्यात आले आहे.

या मशिदीमधून फ्रान्स, ख्रिस्ती, ज्यू आदींच्या विरोधात द्वेष पसरवण्यात येत होतो. तसेच फ्रान्समध्ये शरियतची स्थापना करण्यास प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करण्यात येत होता. यावर्षीच्या शेवटपर्यंत अन्य ७ धार्मिक स्थळे बंद करण्यावर काम चालू आहे, असे फ्रान्सच्या अंतर्गत मंत्र्यांनी म्हटले आहे.