काश्मीरमधील वैद्यकीय महाविद्यालयांतील दोघा विद्यार्थ्यांवर बेकायदा प्रतिबंधक हालचाली कायद्याच्या अंतर्गत गुन्हे नोंद

पाकने भारत-पाक क्रिकेट सामना जिंकल्यावर विजय साजरा केल्याचे प्रकरण

केवळ गुन्हे नोंद करून न थांबता अशांना अटक करून कारागृहात डांबले पाहिजे ! – संपादक 

पाकिस्तानचा विजय साजरा करताना काश्मिरी विद्यार्थी

श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – टी-२० विश्‍वचषक क्रिकेट स्पर्धेत पाकिस्तानने भारताचा पराभव केल्यानंतर भारतात अनेक ठिकाणी पाकिस्तानचा विजय साजरा केल्याच्या घटना घडल्या. या प्रकरणी श्रीनगर येथील वैद्यकीय महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांविरुद्ध बेकायदा प्रतिबंधक हालचाली कायद्याच्या अंतर्गत (यू.ए.पी.ए. अंतर्गत) २ गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. करण नगर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि ‘शेर-ए-कश्मीर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायंसेस’ यांच्या वसतीगृहात रहाणार्‍या विद्यार्थ्यांवर हे गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.