पाकचे माजी गोलंदाज वकार युनूस यांची क्षमायाचना !

  • भारत-पाक किक्रेट सामन्याचे प्रकरण

  • ‘पाकच्या खेळाडूने हिंदूंमध्ये उभे राहून नमाजपठण करणे अधिक महत्त्वाचे’, असे केले होते विधान !  

भारतीय क्रिकेटपटू इतकी वर्षे हिंदुद्वेषी मानसिका असलेल्या पाक क्रिकेटपटूंशी खेळत आले आणि पाकप्रेमी भारतीय त्याचे समर्थन करत होते, हे लक्षात घ्या ! – संपादक 
(डावीकडे) पाकचे माजी गोलंदाज वकार युनूस

नवी देहली – भारत आणि पाक यांच्यातील सामन्यात भारताचा पराभव झाल्यानंतर पाकच्या खेळाडूंपैकी रिझवान याने मैदानात नमाजपठण केले. याविषयी पाकचे माजी गोलंदाज वकार युनूस यांनी ‘रिझवानने विजय प्राप्त केल्यानंतर भर मैदानात नमाजपठण केले, हे माझ्यासाठी त्याच्या खेळीपेक्षाही अधिक महत्त्वाचे ठरले. विशेषत: सर्व हिंदूंमध्ये (भारतीय हिंदु खेळाडूंमध्ये) उभे राहून त्याने नमाजपठण केले’, असे विधान एका वृत्तवाहिनीवरील चर्चेमध्ये केले होते. यावरून त्यांच्यावर सर्वच स्तरावरून टीका होऊ लागल्यावर युनूस यांनी क्षमा मागितली आहे.

१. युनूस ट्वीट करून म्हणाले की, विजयाच्या उत्साहात त्यावेळी मी असे एक विधान केले की, ज्याला मी मानत नाही. यामुळे अनेकांच्या भावनांना दुखावल्या. यासाठी मी सर्वांची क्षमा मागतो. माझा उद्देश चुकीचा नव्हता. माझ्याकडून चूक झाली. खेळ जात आणि धर्म मानत नाही. तो सर्वांना जोडून ठेवायच काम करतो.’

२. यापूर्वी युनूस यांच्या वक्तव्यानंतर भारताचा माजी जलद गती गोलंदाज वेंकटेश प्रसाद आणि प्रख्यात समालोचक हर्षा भोगले यांनी टीका केली होती. वेंकटेश प्रसाद यांनी ट्वीट करून युनूस यांना उद्देशून म्हटले, ‘अशा पद्धतीने वक्तव्य करणे म्हणजे खेळामध्ये जिहादी वृत्ती रुजवणे आणि त्याला एका वाईट उंचीवर नेणे, असे होते. किती निलाजरा माणूस आहे हा !’