रशियामध्ये एकाच दिवसात ३५ सहस्र ६६० जण कोरोनाबाधित !

प्रातिनिधिक छायाचित्र

मॉस्को (रशिया) – रशियामध्ये एका दिवसात ८५ प्रांतांमध्ये ३५ सहस्र ६६० नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत, असे रशियातील प्रशासनाने सांगितले. रशियातील रुग्णंसख्या वाढीचा दर ०.४३ टक्के इतका झाला आहे. मॉस्कोमध्ये सर्वाधिक ५ सहस्र २७९ नवीन करोनाचे रुग्ण सापडले आहेत. रशियात दिवसभरात १ सहस्र ७२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. रशियात आतापर्यंत २ लाख ३० सहस्र ६०० लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.