उत्तरप्रदेश आणि बिहार राज्यांमध्ये नवरात्रीनिमित्त ‘ऑनलाईन’ विशेष सत्संग आणि सामूहिक नामजप यांचे आयोजन

हिंदु जनजागृती समितीचा उपक्रम

पाटलीपुत्र (पाटणा, बिहार) – नवरात्रीच्या कालावधीमध्ये देवीभक्तांना देवीचे तत्त्व अधिकााधिक ग्रहण करता यावे, यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ९ दिवसांचे ‘ऑनलाईन’ विशेष सत्संग आणि सामूहिक नामजप यांचे आयोजन करण्यात आले होते. या ९ दिवसांमध्ये विशेष सत्संगात श्री दुर्गादेवीशी संबंधित पूजाविधीतील शास्त्रोक्त पद्धतीमागील शास्त्र सांगितले. याखेरीज विविध चित्रपट, चलचित्रे, विज्ञापने यांच्या माध्यमातून होणारा देवतांचा अवमान, गरब्याला प्राप्त झालेले अयोग्य स्वरूप यांविषयी जागृती करण्यात आली. ‘माध्यमांद्वारे होणारा देवतांचा अवमान थांबवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू’, अशी सिद्धता अनेकांनी दर्शवली. या वेळी ‘सामूहिक नामजपाच्या वेळी देवीचे दर्शन झाले’, अशी अनुभूती अनेक जिज्ञासूंनी सांगितली.

विशेष : ‘ऑनलाईन’ सत्संगाला उपस्थित रहाणार्‍या २ जिज्ञासूंनी या विशेष सत्संगात श्री दुर्गादेवीशी संबंधित पूजाविधीचा विषय प्रस्तुत केला.

अनुभूती

सौ. सावित्री तिवारी, बक्सर, बिहार : देवीचा नामजप चालू असतांना मला पुष्कळ कुंकू दिसले आणि त्यामध्ये देवी उभी आहे, असे दृश्य दिसले.

वैशिष्ट्यपूर्ण अभिप्राय

१. सौ. मालती सिंह, प्रयागराज, उत्तरप्रदेश : एकट्याने नामजप करण्यापेक्षा सर्वांसमवेत नामजप केल्याने मनाला अधिक चांगले वाटले.

२. सौ. पूनम राय, गया, बिहार : अनेक वर्षांपासून नवरात्रीमध्ये मी देवीचे पूजन करत आली आहे; परंतु सत्संगामध्ये सांगितलेल्या शास्त्राप्रमाणे भावपूर्ण पूजन केल्याने मला आनंद मिळाला.

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक