५५ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्चस्वर्ग लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली चिपळूण (रत्नागिरी) येथील चि. गायत्री प्रशांत अष्टेकर (वय १ वर्ष) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! या पिढीतील चि. गायत्री प्रशांत अष्टेकर एक आहे !

आश्विन कृष्ण पक्ष द्वितीया (२२.१०.२०२१) या दिवशी चि. गायत्री प्रशांत अष्टेकर हिचा प्रथम वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिच्या आईला गरोदरपणात जाणवलेली सूत्रे आणि कुटुंबियांना जाणवलेली गायत्रीची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

चि. गायत्री अष्टेकर

चि. गायत्री प्रशांत अष्टेकर हिला प्रथम वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !

१. गरोदरपण

१ अ. देवाने करवून घेतलेली साधना : ‘गरोदरपणात ९ मास माझ्याकडून देवाने साधना करवून घेतली. देव माझ्याकडून नियमितपणे प्रार्थना, नामजप, मंत्रपठण आणि भावजागृतीचे प्रयत्न करवून घेत होता. त्यामुळे मला गुरुदेव आणि कृष्ण यांच्याप्रती कृतज्ञता वाटत होती. माझी नियमित भावजागृती होत असे.

१ आ. ‘श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत’ ग्रंथांचे प्रतिदिन वाचन करणे : आमच्या घरी ‘श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत’ ग्रंथ आहे. माझ्याकडून त्याचे प्रतिदिन वाचन होत असे. त्या ग्रंथाचे वाचन झाल्यावर माझे मन शांत होत असे. तेव्हा मला माझ्यावरील आवरण नाहीसे झाल्याचे जाणवायचे आणि मन निर्विचार व्हायचे.

१ इ. व्यष्टी साधना करत असतांना ‘काहीतरी सेवा करावी किंवा आश्रमात जावे’, असे मला वाटायचे.

१ ई. घरातील सर्व कामे करूनही मला कधी थकवा जाणवला नाही. गरोदरपणातील ९ मासांच्या कालावधीत मला कोणताही त्रास झाला नाही.

१ उ. नामजप किंवा मंत्र म्हणत असतांना ‘गर्भाला आनंद होत आहे’, असे जाणवणे : मी झोपल्यावर ‘गर्भ झोपला आहे’, अशी मला जाणीव व्हायची आणि मी झोपून उठल्यावर मला गर्भाची हालचाल जाणवायची. मी नामजप किंवा मंत्र म्हणत असतांना मला गर्भाची हालचाल जाणवायची. तेव्हा ‘गर्भाला आनंद होत आहे’, असे मला जाणवायचे.

१ ऊ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने ९ घंट्यांच्या ग्रहणकाळातील नियमांचे पालन करता येणे : २०.६.२०२० या दिवशी मला सहावा मास असतांना सूर्यग्रहण होते. पहाटे ४.४५ वाजल्यापासून ते दुपारी १.२८ वाजेपर्यंत मला ग्रहणाचे नियम पाळायचे होते. खरेतर इतक्या मोठ्या कालावधीसाठी ग्रहणाचे नियम पाळणे कठीणच होते. देवाच्या कृपेने मला ९ घंटे अन्नग्रहण न करता, मलमूत्र विसर्जन न करता आणि न झोपता ग्रहणाचे नियम पाळता आले. ग्रहणाच्या कालावधीत मी दत्ताचा नामजप, प्रार्थना आणि ग्रंथवाचन करत होते. ‘९ घंटे कसे संपले ?’, हे मला समजलेच नाही. ग्रहणकाळात मला उत्साह वाटत होता. गुरुदेवांच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) कृपेनेच मला ग्रहणातील नियमांचे पालन करता आले.

श्री. प्रशांत अष्टेकर

२. प्रसुती

२ अ. देवाच्या अनुसंधानात राहून प्रसुती निर्विघ्नपणे पार पडणे : प्रसुतीच्या वेदना चालू झाल्यावर मला पहाटे ५ वाजता रुग्णालयात नेण्यात आले. आधुनिक वैद्यांनी माझी पडताळणी केली. मला कळा येत नसल्यामुळे मला कळा येण्याचे इंजेक्शन दिले. मी श्रीकृष्णाला सतत प्रार्थना आणि नामजप करत होते. काही वेळाने माझा दत्ताचा नामजप चालू झाला आणि नामजप करतांना मी देहभान विसरून गेले. मला वेदना होत नव्हत्या. आधुनिक वैद्य आल्यावर ‘साक्षात् कुलदेवता महालक्ष्मी आणि भगवान श्रीकृष्ण माझी प्रसुती करत आहेत’, असा माझा भाव होता. तेव्हाही मला वेदना जाणवत नव्हत्या, तरीही देवाच्या कृपेने माझी नैसर्गिक प्रसुती झाली. त्यामुळे मला भगवान श्रीकृष्ण, आई महालक्ष्मी आणि गुरुदेव यांच्याप्रती कृतज्ञता वाटली.

३. जन्मानंतर

३ अ. जन्म ते ६ मास

१. बालिकेला आजीच्या (वडिलांच्या आईच्या, सौ. कविता अष्टेकर यांच्या) हातात दिल्यावर तिने डोळे उघडून आजीकडे बघून स्मितहास्य केले.’ – सौ. प्रिया प्रशांत अष्टेकर (गायत्रीची आई), चिपळूण, जिल्हा रत्नागिरी.

२. ‘बालिकेच्या जन्मानंतर मी तिला पाहिल्यावर ती माझ्याकडे ‘जणू काही आमची पहिल्यापासून ओळख आहे’, अशी १५ मिनिटे एकटक बघत होती.’ – सौ. कविता केशव अष्टेकर (आजी, गायत्रीच्या वडिलांची आई), चिपळूण, रत्नागिरी.

३. ‘दोन मासांनंतर गायत्री देव्हार्‍यातील श्रीकृष्ण आणि कुलदेवता यांच्या चित्रांकडे, प.पू. गुरुदेवांच्या छायाचित्राकडे आणि दिव्याकडे बघत रहायची. ती देवघरातील चित्रे आणि छायाचित्रे बघून आनंदी व्हायची अन् त्यांना हात लावण्याचा प्रयत्न करायची.’ – सौ. कविता केशव अष्टेकर

४. गायत्रीला झोपतांना श्रीराम आणि श्रीकृष्ण यांचा पाळणा ऐकायला आवडतो. तिला नामजप आणि मंत्रजप ऐकायला आवडतात. कुणी नामजप करत असेल, तर गायत्री त्या व्यक्तीकडे बघत बसते. तिला ‘श्रीराम जय राम जय जय राम ।’, हा नामजप आवडतो. ती रडत असतांना श्रीरामाचा जप लावल्यावर लगेच शांत होते. तिला कीर्तन ऐकायला आवडते.

५. पाचव्या मासापासून गायत्रीला आरती ऐकायला आवडू लागली. ती सर्व देवांच्या आरत्या आनंदाने ऐकते.

६. तिला आई-बाबा हे शब्द समजायला पुष्कळ मास लागले; पण ‘कृष्णा मामा’ हा शब्द तिने आधी आत्मसात केला. आम्ही ‘कृष्णमामा’ असे म्हटल्यावर गायत्री श्रीकृष्णाच्या चित्राकडे आणि गुरुदेवांच्या छायाचित्राकडे बघते अन् हसते.’ – सौ. प्रिया प्रशांत अष्टेकर आणि श्री. प्रशांत केशव अष्टेकर (गायत्रीचे वडील)

७. ‘होळी पौर्णिमेच्या दिवशी, म्हणजे गायत्री सहाव्या मासांची असतांना तिला अंघोळ घातल्यावर तिच्या गालावर ‘ॐ’ उमटला होता. तो रात्रभर तसाच होता.’ – सौ. कविता केशव अष्टेकर

सौ. प्रिया अष्टेकर

३ आ. वय ७ मास ते १ वर्ष

१. ‘तिला घरासमोर असलेला सनातनचा आकाशकंदिल बघायला आवडतो. ती आकाशकंदिलाकडे एकटक बघत असते आणि त्याला हात लावण्याचा प्रयत्न करते.

२. ती ‘श्री बगलामुखीस्तोत्र’ शांतपणे ऐकते. ती भिंतीवर लावलेल्या ‘सनातन पंचांगा’कडे झेप घेते. तिला देवतांची चित्रे बघायला आवडतात. तिला सनातन पंचांगामधील श्रीकृष्णाचे चित्र दाखवून ‘पापी घे’, असे सांगितल्यावर ती लगेच पापी घेते.

३. आम्ही तिला ‘देवाला नमस्कार कर’, असे सांगिल्यावर ती परम पूज्यांच्या छायाचित्राकडे बघून नमस्कार करते. तिला जप करत किंवा भजने म्हणत जेवण भरवावे लागते. ‘विठाई माऊली’, असे आम्ही म्हटले की, ती लगेच टाळ्या वाजवते.

४. आठव्या मासापासून तिला मोरपिसाने आवरण काढायला आणि कापूर अन् अत्तर यांचे उपाय करायला आवडतात.

५. तिला दैनिक ‘सनातन प्रभात’चा अंक पाहून आनंद होतो. ती दैनिक ‘सनातन प्रभात’ हातातून खाली ठेवत नाही.

६. तिला वैजयंती माळ आवडते. ती अशा पद्धतीने माळ बोटांमध्ये धरते की, ‘जणूकाही ती नामजप करत आहे’, असे वाटते.

७. गायत्रीला प्रतिदिन ‘अष्टलक्ष्मी’चे गीत ऐकायला आवडते. गीत लागले की, ती तिच्या मांडीवर तालात हात मारते आणि सारखे तेच गीत लावायला सांगते.

८. मी (प्रशांत) तिला घेऊन सकाळी ‘कराग्रे वसते लक्ष्मी..’, हा श्लोक म्हणतो आणि प्रार्थना करतो. तेव्हा ती नमस्कार करून श्लोक आणि प्रार्थना ऐकते.

९. तिच्या हातांची बोटे नेहमी मुद्रा केलेल्या स्थितीत असतात.’

– सौ. प्रिया प्रशांत अष्टेकर आणि श्री. प्रशांत केशव अष्टेकर

१०. ‘तिला लहानपणापासून सात्त्विक व्यक्तींकडे जाण्याची ओढ आहे. ती अनोळखी व्यक्तींचे निरीक्षण करते आणि त्यांच्याकडे पाहून तिला आनंद झाला, तरच ती त्यांच्याकडे जाते.

११. गायत्रीच्या प्रेमळ स्वभावामुळे तिच्याकडे बघितल्यावर मन शांत होते आणि तिचा सहवास हवाहवासा वाटतो. तिला घेतल्यावर आनंद होतो.’

– सौ. कविता केशव अष्टेकर

१२. ‘गायत्री शांत आणि निरागस आहे.

१३. तिला तुळस पुष्कळ आवडते. तिला तुळशीजवळ नेल्यावर ती प्रेमाने तुळशीच्या पानांवरून हात फिरवते.’

– श्री. केशव तुळाजी अष्टेकर (आजोबा, गायत्रीच्या वडिलांचे वडील), चिपळूण, रत्नागिरी.

४. गायत्रीचे स्वभावदोष

४ अ. चिडचिड करणे : तिच्या हातातील वस्तू काढून घेतल्यावर ती चिडते आणि रडते अन् वस्तू मिळण्यासाठी हट्ट करते.

४ आ. ‘इतरांनी कौतुक करावे’, असे वाटणे : ती एखादी कृती करत असतांना ‘इतरांनी तिच्याकडे पहावे’, असे तिला वाटते. तेव्हा तिच्याकडे कुणी पहात असले की, तिला आनंद होतो.’

– श्री. प्रशांत केशव अष्टेकर

(लेखातील सर्व सूत्रांचा दिनांक (५.१०.२०२१)

‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले