नाशिक, २० ऑक्टोबर – युवासेना युवती दिंडोरी लोकसभा विस्तारक अश्विनीताई चव्हाण, युवासेना युवती नाशिक ग्रामीण उपजिल्हाधिकारी कु. शीतल पवार, तसेच युवासेना युवती नाशिक ग्रामीण यांच्या वतीने कोजागरी पौर्णिमेच्या निमित्ताने सप्तशृंगीगडावर पायी जाणार्या भाविकांना पाण्याच्या बाटल्या आणि केळी यांचे वाटप करण्यात आले. युवासेना कार्यकारिणी सदस्या आणि मुंबई विद्यापीठ सिनेट सदस्या सौ. शीतलताई देवरूखकर-शेठ यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम करण्यात आला.