‘लव्ह जिहाद’ अस्तित्वात नाही, तर ‘लव्ह जिहाद’विरोधी कायद्याला विरोध का ? – अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, राष्ट्रीय अध्यक्ष, हिंदु विधीज्ञ परिषद

(प्रतिकात्मक छायाचित्र)

विविध प्रकारच्या ‘जिहाद’प्रमाणेच ‘लव्ह जिहाद’ हेसुद्धा जिहाद्यांनी हिंदु समाजाविरोधात पुकारलेले युद्धच आहे. सामान्य घरातील हिंदु युवतींपासून क्रीडा क्षेत्र, चित्रपटसृष्टी आदी विविध क्षेत्रांतील अनेक हिंदु युवती आणि महिला आतापर्यंत ‘लव्ह जिहाद’ला बळी पडल्या आहेत. त्यांची फसवणूक झाली आहे, तसेच त्यांचे भयानक शोषणही होत आहे, याची अनेक उदाहरणे विविध माध्यमांतून समोर आली आहेत. ‘लव्ह जिहाद’मुळे मोठ्या प्रमाणात भारतासह देशाबाहेरील हिंदूंसहित शीख युवतींचेही धर्मांतर झाले असून हिंदु कुटुंबव्यवस्थेवर याचा गंभीर परिणाम होत आहे. सध्या उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश आणि गुजरात येथील सरकारांनी लव्ह जिहाद विरोधातील कायदा केला आहे. जर ‘लव्ह जिहाद अस्तिवात नाही’, असे जे विरोधक म्हणतात, त्यांचा लव्ह जिहाद विरोधातील कायद्याला विरोध का आहे ?