भारत अफगाणिस्तानला ५० सहस्र मेट्रिक टन गहू पाठवण्याच्या प्रयत्नात !

भारताची गांधीगिरी चालूच ! मानवतेच्या दृष्टीने पाठवण्यात येणारे हे साहाय्य गरीब अफगाणी लोकांपर्यंत पोचेल कि तालिबानीच ते खाऊन टाकतील, याची निश्‍चिती कोण देणार ? – संपादक

नवी देहली – भारत सरकार अफगाणिस्तानला मानवतेच्या दृष्टीने साहाय्य म्हणून ५० सहस्र मेट्रिक टन गहू, तसेच औषधे पाठवण्याचा विचार करत आहे. गेल्या वर्षी भारताने ७५ सहस्र मेट्रिक टन गहू पाठवला होता. तेव्हा तो इराणच्या चाबाहार बंदराच्या मार्गे पाठवण्यात आला होता. आता अटारी सीमेवरून पाकिस्तानमार्गे पाठवण्याचा भारताचा विचार चालू आहे. त्यासाठी पाकशी चर्चा करण्यात येत आहे. (पाकच्या मार्गे पाठवण्यात येणारा गहू अफगाणिस्तानपर्यंत पोचेल का ? – संपादक)