आध्यात्मिक मित्र दिला गुरुमाऊलीने ।

‘माझे आध्यात्मिक मित्र श्री. तुकाराम लोंढे अशिक्षित असल्याने त्यांना लिहिता-वाचता येत नाही. तरीही ते परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने थोडेफार वाचण्याचा आणि लिहिण्याचा प्रयत्न करतात. त्यांनी भ्रमणभाषवर बोलून (व्हॉइस टायपिंग) केलेल्या कविता मला ‘व्हॉट्सॲप’वर पाठवल्या. परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेने मला त्याचे संकलन करण्याचे भाग्य लाभले. आम्ही दोघे ते लिखाण परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणी अर्पण करतो. – (पू.) शिवाजी वटकर (१४.५.२०२१)

श्री. तुकाराम लोंढे

आध्यात्मिक मित्र (टीप १) दिला गुरुमाऊलीने (टीप २) ।
म्हणुनी भोगितो कठोर प्रारब्धभोग आनंदाने ।। १ ।।

सदा वाटे माझ्या मनी,  संत मित्र आला जीवनी ।
साधना आणि गुरुसेवा  होतसे भाव ठेवूनी । ।। २ ।।

प्रत्येक दिवस गुरुपौर्णिमेचा उत्सव मानुनी ।
साष्टांग नमन करतो श्री गुरुदेवांच्या चरणी ।। ३ ।।

टीप १ – आध्यात्मिक मित्र पू. शिवाजी वटकर
टीप २ – परात्पर गुरु डॉ. आठवले

– श्री. तुकाराम लोंढे (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१४.५.२०२१)


मित्राविना जीवन जाईल फुका ।

माझा मित्र (टीप १) आहे हो संत ।
ठेवतसे हो मला तो सदा आनंदी ।। १ ।।

वेळोवेळी करिती हो विचारपूस ।
गुरूंनी (टीप २) करून दिल्या दोन मित्रांच्या भेटी ।। २ ।।

एकामेकांच्या मनातील विचार सांगती ।
हितगुजाने मने हलकी होती ।। ३ ।।

मित्र माझा असे हो सखा ।
मित्राविना जीवन जाईल फुका ।। ४ ।।

टीप १ – आध्यात्मिक मित्र पू. शिवाजी वटकर
टीप २ – परात्पर गुरु डॉ. आठवले

– श्री. तुकाराम लोंढे (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (६.५.२०२१)