बांगलादेशात पुन्हा हिंदूंवर आक्रमण : ४० जण घायाळ

  • मंदिराची तोडफोड करून लुटले

  • वाहनांची जाळपोळ

  • आक्रमणासाठी गावठी बाँबचाही वापर

  • गेले काही दिवस बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेली आक्रमणे रोखण्यास तेथील सरकार आणि पोलीस अपयशी ठरले आहेत, तर भारत निष्क्रीय राहिला आहे, हीच वस्तूस्थिती आहे ! – संपादक
  • ‘जेथे हिंदू संख्येने अल्प आहेत, तेथे ते मार खात असतील, तर जेथे ते संख्येने अधिक आहेत, तेथे त्यांनी कृती केल्यास अल्पसंख्य हिंदूंचे रक्षण होईल’, अशी रणनीती स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी मांडली होती. हिंदूंनी असे करायला हवे, अशी बांगलादेश सरकारची इच्छा आहे का ? – संपादक
बांगलादेशात हिंदूंवर झालेल्या आक्रमणाचे दृश्य

चटगाव (बांगलादेश) – येथील फेनी गावामध्ये धर्माधांनी हिंदूंवर आणि हिंदूंच्या मंदिरावर आक्रमण केल्याची घटना १६ ऑक्टोबरला घडल्याची माहिती ‘बांग्लादेश हिंदू युनिटी कौन्सिल’ने ट्वीट करून दिली आहे. यासमवेत धर्मांधांकडून केल्या जात असलेल्या आक्रमणाचा एक व्हिडिओही या संघटनेने पोस्ट केला आहे. ‘या घटनांमुळे येथे तणावाची स्थिती आहे’, असेही कौन्सिलने म्हटले आहे.

कौन्सिलने म्हटले आहे की, काही दिवसांपूर्वी नोआखाली आणि अन्य ठिकाणी झालेल्या हिंदूंवरील आक्रमणाच्या विरोधात फेनी गावामध्ये हिंदू निदर्शने करत असतांना धर्मांधांनी त्यांच्यावर आक्रमण केले. धर्मांधांनी येथील काली मंदिराचीही तोडफोड करत  मंदिराची संपत्तीही लुटली. वाहनांची जाळपोळ करण्यात आली. या वेळी परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. या वेळी ४० जण घायाळ झाले. धर्मांधांनी या वेळी गावठी बाँबचाही वापर केला.