सनातनचे प्रेरणास्थान प.पू. रामानंद महाराज यांच्या १७ ऑक्टोबर २०२१ या दिवशी असलेल्या जयंतीच्या निमित्ताने…
‘प.पू. श्री अनंतानंद साईश यांच्या देहत्यागानंतर प.पू. दादा (प.पू. भक्तराज महाराज यांचे उत्तराधिकारी प.पू. रामानंद महाराज) प.पू. बाबांच्या (प.पू. भक्तराज महाराज) समवेत सावलीसारखे असायचे, मग ते इंदूरात, महाराष्ट्रात, देहलीला असोत कि विशाखापट्टणम्ला असोत.’
प.पू. बाबांच्या मुखातून निघालेला शब्द झेलण्यासाठी प.पू. दादा तन-मनाने दक्ष असत. बाहेरगावी जाणे असो किंवा भजनाला जाणे असो. त्यांनी रात्र पाहिली नाही कि दिवस. सतत सेवाव्रतधारीप्रमाणे अटल. प.पू. बाबांचे तर फक्त भजन; पण प.पू. दादा म्हणजे नोकरी आणि भजन दोन्ही ! प.पू. दादा सदैव तत्पर ! गुरुनिष्ठा आणि गुरूंवरचे प्रेम शिकायचे, तर ते प.पू. बाबांसमवेत सावलीसारखे राहून, त्यांची सेवा करणार्या प.पू. दादांकडून शिकता येईल.’
– श्री. दादा दळवी (प.पू. भक्तराज महाराज यांचे भक्त)
संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘संत भक्तराज महाराज यांचा अमृत महोत्सव, देहत्याग व उत्तराधिकारी’