मणीपूरमध्ये आतंकवाद्यांच्या गोळीबारात ५ जणांचा मृत्यू

आतंकवादग्रस्त भारत ! – संपादक

घटनास्थळी सुरक्षादल

कांगपोकपी (मणीपूर) – येथील बी गॅमनोम या गावात सुरक्षादलाशी झालेल्या चकमकीत ठार झालेल्या २ आतंकवाद्यांच्या अंत्यसंस्कारात सहभागी होण्यासाठी जमलेल्या ग्रामस्थांवर ‘कुकी’ नावाच्या डोंगराळ भागात रहाणार्‍या आतंकवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. यात ५ जणांचा मृत्यू झाला. राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री एन्. बीरेन सिंह यांनी या आक्रमणाचा निषेध केला आहे. आतंकवाद्यांना पकडण्यासाठी राज्य पोलीस आणि केंद्रीय सुरक्षा दल यांनी मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम चालू केली असल्याची माहिती पोलीस महानिरीक्षक ल्युसेह किप्गेन यांनी दिली आहे.