‘गेल्या अनेक दिवसांपासून काही समाजविरोधी घटक पुण्यातील नवसह्याद्री, कर्वेनगर आणि देवेश चौक या परिसरांत रस्त्यांवरील भिंतींवर ब्राह्मण समाजाच्या विरोधात लिखाण करत असल्याचे आढळून आले. यामुळे समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने यासंदर्भात अलंकार पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवल्यावर पोलिसांनी त्या जागेवरील ब्राह्मणविरोधी लिखाण त्वरित पुसले आणि भविष्यात अशा गोष्टींना आळा घालण्याचे, तसेच त्यावर लक्ष ठेवण्याचे आश्वासन दिले.’