‘८.१२.२०२० या दिवशी मी भावसत्संगाला बसले होते. तेव्हा माझे लक्ष तेथे ठेवलेल्या श्री सरस्वतीमातेच्या मूर्तीकडे गेले. देवीकडे पाहून मी मनातच म्हणाले, ‘किती सुंदर रूप आहे देवीचे !’ मी देवीच्या उंच मूर्तीच्या खालीच बसले होते. मी मूर्तीकडे पहात असतांना ‘देवीने तिची मान अकस्मात् माझ्याकडे वळवली’, असे मला जाणवले. ‘तिचे डोळेसुद्धा माझ्याकडेच पहात आहेत’, असे मला जाणवले. तेव्हा मी थक्क होऊन मूर्तीकडे पहात राहिले. मला आनंद होऊन पुष्कळ कृतज्ञता वाटली. त्यानंतर २-३ मिनिटांनंतर मी परत देवीकडे पाहिले. तेव्हा मला मूर्ती आधीच्या स्थितीत जशी होती, तशीच दिसली. तेव्हा ‘देवीकडे आपण एक क्षण जरी भावपूर्ण पाहिले, तरी करुणामयी माता आपल्याला पुष्कळ आनंद आणि तिच्या अस्तित्वाची प्रचीती देते’, असे माझ्या लक्षात आले.
– कु. अपाला औंधकर (आध्यात्मिक पातळी ५९ टक्के) (वय १४ वर्षे) , सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (८.१२.२०२०)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |