श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ घेत असलेल्या दैवी ‘भाववृद्धी सत्संगा’चा सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांनी वर्णिलेला महिमा !

आज भाद्रपद अमावास्या (६.१०.२०२१) या दिवशी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने…

आज भाद्रपद अमावास्या (६.१०.२०२१) या दिवशी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचा वाढदिवस आहे. महर्षींनी सांगितल्याप्रमाणे त्या परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या एक आध्यात्मिक उत्तराधिकारी आहेत. सनातनच्या सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांनी, तसेच अन्य साधकांनी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्याप्रती केलेले कृतज्ञतापर लिखाण येथे देत आहोत.

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांना वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराकडून कृतज्ञतापूर्वक नमस्कार !

१. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ ‘भाववृद्धी सत्संगा’च्या माध्यमातून आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी बळ देत असून असंख्य जिवांना या सत्संगाचा लाभ होत असणे

‘श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ जेव्हापासून ‘भाववृद्धी सत्संग’ घेत आहेत, तेव्हापासून प्रत्यक्ष ‘महालक्ष्मी’च भरभरून कृपा करत आहे आणि सत्संगाच्या माध्यमातून आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी बळ देत आहे. त्या सर्वांचे धैर्य वाढवत आहेत आणि सर्वांमध्ये भावाचे बीजही रोवत आहेत. ‘न भूतो न भविष्यति ।’ (यापूर्वी कधी झाले नाही आणि यानंतर कधी होणार नाही.) अशा प्रकारे होत असलेल्या या दैवी सत्संगाचा लाभ आपल्यासारख्या असंख्य जिवांना होत आहे.

२. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदाताई यांचा सत्संग मिळाल्याबद्दल सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांना कृतज्ञता वाटणे आणि त्यांना अंतर्मनातून कविता स्फुरणे

‘श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदाताई यांचा सत्संग मिळणे, त्यांची दैवी वाणी कानी पडणे आणि आपल्या अंतर्मनात भावाचे तरंग अनुभवता येणे’, हे सर्व असामान्य अन् अद्भुत आहे. ‘याविषयी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच आहे’, असे वाटून मला उमाळा येऊ लागला. ‘गुरुमाऊलींनी आपल्याला श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदाताई दिल्या’, याबद्दल मला पुष्कळ कृतज्ञता वाटली. भ्रमणभाषवरून श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदाताई यांना संदेश पाठवून कृतज्ञता व्यक्त करत असतांना आपसुकच मला अंतर्मनातून पुढील कविता स्फुरली.

सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर

मुले तुझी गं आम्ही, तू लेकुरवाळी माता आमुची ।

आपण जे आम्हा सर्वांना देत आहात ।
ते कुणीच कुणाला कोणत्याच जन्मी आतापर्यंत दिले नसेल ।
आपण जे आमच्यासाठी करत आहात ।
ते कुणीच कुणासाठी कोणत्याच युगात केले नसेल ।। १ ।।

आम्ही अपात्र जीव, आलो आपल्या चरणी ।
मागतो मागणे पात्र होण्यासाठी ।
तूच मायमाऊली, कृपेची सावली आमुची ।
कर अर्पण आम्हास गुरुमाऊलींच्या चरणी ।। २ ।।

हाती घेतलास वसा, उद्धार करण्या या क्षुद्र जिवांचा ।
साधनेचे बाळकडू सातत्याने पाजतेस आम्हा ।
उन्मत्त होती अहं आणि स्वभावदोष आमुचे ।
उन्मळून पडती ते तुझ्या प्रीतीपुढे ।। ३ ।।

प्रारब्ध आमुचे कठीण, फुंकर तू घालतसे ।
सत्संगात तुझ्या कुसंस्कार विरघळून जातात सारे ।
तुझ्या चैतन्याचा पाऊस भिजे आत्मा चिंब त्यात ।। ४ ।।

मुले तुझी गं आम्ही, तू लेकुरवाळी माता आमुची ।
हृदयात प्रीती तुझ्या पाझरत असे आमुच्यासाठी ।
मुखी तुझ्या सरस्वती कानी पडती ते स्वर ।
शुद्ध होई अंतर्मन, भेदे ते आवरण ।
न राही अंतर मग जीव अन् शिव यांत ।। ५ ।।

सामर्थ्य आपुले केवढे, मुंगीलाही हत्तीचे बळ मिळे ।
कृतज्ञता शब्दांत कशी व्यक्त करावी, हे न कळे ।
थिटे ते शब्द, थिटे ती कृतज्ञता माते ।
शरण आलो तुझ्या चरणी माते ।। ६ ।।

नतमस्तक आम्ही तुझ्यापुढे गं ।
नतमस्तक आम्ही तुझ्यापुढे ।। ७ ।।

समर्पित घे करूनी, चरणी रहावे तुझ्या रज बनूनी ।
तूच विलीन करणार आम्हास गुरुमाऊलींच्या चरणी ।। ८ ।।

– (सद्गुरु) कु. अनुराधा वाडेकर (१६.९.२०२१)

(सद्गुरु) कु. अनुराधा वाडेकर  यांनी त्यांना अंतर्मनातून स्फुरलेली कविता श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदाताई यांना पाठवल्यानंतर लक्षात आलेले त्यांचे वैशिष्ट्य !

नंतर मी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदाताई यांना भ्रमणभाषवरून संदेशाद्वारे कृतज्ञता व्यक्त केली. त्यानंतर त्यांनी मला पुढील संदेश पाठवला.

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदाताई : सदगुरु ताई (टीप १), ‘हे मधुर बोल, मधुर मधुर परम पूज्य गुरुदेवांसाठी आहेत’, असे मला अंतरंगात जाणवले.

(या उत्तरातून श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदाताई यांनी स्वतःकडे काहीच कर्तेपणा न घेता तो गुरुदेवांच्या चरणी अर्पण केला.)

मी : आमच्यासाठी तुम्ही तिघे (टीप २) आता एकच आहात !’

टीप १ : सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर

टीप २ : परात्पर गुरु डॉ. आठवले, श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

– (सद्गुरु) कु. अनुराधा वाडेकर (१६.९.२०२१)

या कवितेत प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार सद् गुरुंच्या  वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक