मुंबई – गोवा राज्यात आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात ८ ऑक्टोबरपर्यंत तुरळक ठिकाणी ढगांचा गडगडाट आणि सोसाट्याच्या वार्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई यांच्याकडून वर्तवण्यात आली आहे. या अनुषंगाने आवश्यक ती दक्षता घ्यावी, असे आवाहन गोवा राज्य आणि सिंधुदुर्ग जिल्हा येथील स्थानिक प्रशासनाने केले आहे.